गंगापूर, (प्रतिनिधी) नायब तहसीलदार सचिन वाघमारे यांनी धडाकेबाज कारवाई करत अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या गंगापूर तालुक्यातील आगाठाण, चिचखेडा येथील शिवरस्ता मोकळा करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी धन्यवाद मानले आहेत. आतापर्यंत नायब तहसीलदार वाघमारे यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाणारे बंद असलेले अनेक शिवरस्ते मोकळे केले आहे.
महसूल शेतात जाणारे व शिवरस्ते बंद करता येत नसून शेतकऱ्यांनी अडवलेले रस्ते मोकळे करणार असल्याचे गंगापूर प्रशिक्षण तहसीलदार सागर वाघमारे, नायब तहसीलदार सचिन वाघमारे व शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलिम चाऊस, पोलीस उपनिरीक्षक गणेश काळे यांचे प्रयत्नामुळे अनेक दिवसाचा रस्ता मोकळा झाला आहे सर्व अधिनियमानुसार शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
आगाठाण तालुक्यातील येथील शंकर औताडे यांच्या गट नंबर १५ व चिचखेडा येथील नर्मदा औताडे यांच्या गट नंबर ७२,७३,७६,७७ यांच्या शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने दोन वर्षांपासून शिवरस्ता मोकळा करून देण्यात यावा, म्हणून शंकर औताडे व नर्मदा औताडे यांनी महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग
मुंबई यांच्याकडे प्रकरण दाखल केले होते.
गंगापूर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार सचिन वाघमारे यांनी धडाकेबाज कारवाई करत दोन वर्षांपासून बंद असलेला शिव रस्ता २४ डिसेंबर रोजी नायब तहसीलदार वाघमारे यांनी फौजफाट्यासह पोलिस बंदोबस्त घेऊन जायमोक्यावर जाऊन भूमी अभिलेख विभागाकडून हद्द खुना कायम करुन जेसीबीच्या सहाय्याने रस्ता मोकळा केल्याने अखेर शेतकऱ्यांच्या शेतात जाणारा शिवरस्ता मोकळा झाल्याने शेतकऱ्यांनी नायब तहसीलदार वाघमारे यांना धन्यवाद दिले आहे. यावेळी ग्राम महसूल अधिकारी अफरीन पटेल, पोलीस कर्मचारी योगेश हरणे, अकबर पटेल, भूमी अभिलेख, पोलिस कर्मचारी शेतकरी उपस्थित होते.














